इन्वेस्टमेंट

सोनं- चांदी झाले स्वस्त Gold and silver prices

Bussness batmya

मुंबईः  Gold and silver prices fell  गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये आज सोने चांदी खूपच कमी भावाला विकले जात आहे. 999 शुद्ध असणारे दहा ग्रॅम सोन्याची किंमत कमी होऊन 51509 रुपये इतकी झाली. चांदीने देखील आपला भाव कमी केला आहे. चांदी आज 67344 रुपयांनी विकली जात आहे. सोन्या-चांदीचे दर नियमितपणे दिवसभरातून दोन वेळा जाहीर केले जातात. हे भाव एकदा सकाळी आणि संध्याकाळी जाहीर केले जातात. ibjarates.com नुसार, 995 शुद्ध 10 ग्रॅम सोने आज 51303 रुपयांना मिळत आहे.आज सुद्धा सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली.

भारतीय सराफा बाजारात ( Indian Gold Market) आठवड्यातील दुसऱ्या दिवसाचे कामकाज म्हणजेच मंगळवारच्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव (Gold- silver rate) जाहीर केले गेले. सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे आणि म्हणूनच सगळीकडे याबद्दल चर्चा देखील केली जात आहे.

585 शुद्ध असणारे सोन्याचा दरात घसरण झाली आहे. आता हे सोने 30133 रुपये प्रति तोळा विकले जात आहे. त्याचबरोबर 999 शुद्ध असणारी एक किलो चांदीची किंमत कमी होऊन 67344 रुपयांवर पोहचली आहे. 916 शुद्ध सोने 47182 रुपयांत विकले जात आहे याशिवाय 750 शुद्ध असणाऱ्या सोन्याचा दर 38632 वर पोहचलेला आहे.

गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या किंमतीत किती झालाय बदल ?

सोने चांदी यांच्या किमती मध्ये रोज बदल झालेला पाहायला मिळतो. 999 शुद्ध असणाऱ्या सोन्याची किंमत आज कमी झाली आहे.त्यानंतर हे सोने 125 रुपयांनी स्वस्त झाले. 995 शुद्ध असणारे सोने आज 181 रुपयायांनी स्वस्त झाले त्याचबरोबर 916 शुद्ध असणारे सोने आज 167 रुपयांनी कमी होऊन विकले जात आहेत. जर 750 शुद्धता असणाऱ्या सोन्या बद्दल बोलायचे झाल्यास या सोन्याची किंमत 136 रुपयांनी कमी झाली असून 585 शुद्धता असणारे सोने आज 106 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे त्याचबरोबर 999 शुद्ध असणारी एक किलो चांदीची किंमत 248 रुपयांनी कमी झाली आहे.

अशी केली जाते शुद्ध सोन्याची पारख

आपण जे दागिने घ्यालतो त्याची शुद्धता तपासण्याचे प्रमाण असते. ज्यामध्ये कॅरेट शी निगडित असणारे वेगवेगळे प्रकारचे निशाण असतात. या निशाणांच्या सहाय्याने आपण सोन्याची शुद्धता तपासू शकतो. सोन्यामध्ये एक कॅरेट पासून 24 कॅरेट पर्यंत वेगवेगळे हॉलमार्क किंवा निशाण पाहायला मिळतात.

22 कॅरेट सोने असेल तर त्यावर 916 लिहिलेले असते

21 कॅरेट ची ज्वेलरी असेल तर 875 लिहिलेले असते

18 कॅरेट ज्वेलरी असेल तर 750 लिहिलेले असते

14 कॅरेट ची ज्वेलरी असेल तर त्यावर 585 लिहिलेले असते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!