आर्थिक

महाराष्ट्रात सोनं महागलं. कसे आहेत दर

business batmya

मुंबईः  :  गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या भावात घौडदोड दिसून येत आहे. देशातील प्रमुख सोने बाजारपेठेत सोन्याचा भाव उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. आज महाराष्ट्रासह देशातील प्रमुख बाजारपेठेत सोन्याला प्रति तोळा 54 हजार रुपये भाव मिळाला.

रशिया-युक्रेन वाद (RUSSIA-UKRANE CRISIS) दिवसागणिक चिघळत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थजगतात वेगवान घडामोडी घडत आहे. भारतीय सोने बाजारावर (INDIAN GOLD RATE) थेट परिणाम दिसून येत आहे.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

देशासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे (GOLD RATE MAHARASHTRA) सोन्याचे आजचे ताजे भाव जाणून घेऊया. चांदीच्या भावानं 72 हजारांचा टप्पा गाठला आहे. सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावातील वाढ सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरतं आहे. ऐन लग्नसराईत सोन्याने उच्चांक गाठल्यास लग्न खरेदीसाठीचा खर्च निश्चितच वधारणार आहे.

प्रति तोळा 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव-

मुंबई- 54330

पुणे-54360

नाशिक-54360

नागपूर-54380

प्रति तोळा 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव-

मुंबई- 49800

पुणे- 49830

नाशिक-49830

नागपूर-49850

गुंतवणुकदारांचा कल सोनं खरेदीकडे

शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरतेचे पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या खरेदी करतांना काळजी घ्या

सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!