gold-prices सोन्याचे दर स्थिर; चांदीच्या दरात किंचित घसरण

Bussness batmya
मुंबईः सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ -उताराच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.gold-prices-stable-slight-fall-in-silver-prices
आज सोन्याचे दर (Today’s gold-silver prices) स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरामध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे.
आज 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 800 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर 52140 रुपये एवढा आहे. चांदीच्या किमतीमध्ये किंचितशी घट झाली असून, आज चांदीचा (silver) भाव 66300 रुपये एवढा आहे. सोन्याच्या दरात प्रत्येक शहरांप्रमाणे थोडा फार बदल होऊ शकतो, हे ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. सोन्याच्या दागिन्यांचा दर सोन्याचा दर अधिक दागिन्याच्या घडनावळीचा दर मिळून निश्चित केला जातो. त्यामुळे सोन्याच्या कीमतीमध्ये कमी -अधिकप्रमाणात तफावत दिसून येते.
राज्याच्या प्रमुख शहारतील सोन्याचे भाव
आज राज्यात सोन्याचे दर स्थिर आहेत. सोन्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गुड रिटर्न्स वेबसाईटकडून प्राप्त माहितीनुसार आज राज्यात सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 800 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा अर्थात दहा ग्रॅमचा दर 52140 रुपये एवढा आहे.
पाहुयात प्रमुख शहरातील सोन्याचे दर आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 47 हजार 800 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 52140 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 47 हजार 8050 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52190 रुपये एवढी आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 47 हजार 8050 इतकी आहे. तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52190 रुपये एवढी आहे. आज चांदीच्या दरात किंचीतशी घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 66300 रुपये झाले आहेत.