उद्योग / व्यवसाय

Gold Silver Rate Today सोने चांदी झाले महाग

Buisness Batmya

नवी दिल्ली: जर तुम्ही आज सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला ते महाग पडणार आहे. कारण भारतीय बाजारात सोन्याचे पुन्हा विक्रमी पातळीवर पोहचले आहे. त्यामुळे आता ऐन लग्नसराईच्या मोसमात आणि रथसप्तमीच्या तोंडावर सोन्याच्या भाववाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी खड्डा पडणार असून जास्त खर्च करावा लागणार आहे.

Infinix चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च होण्यासाठी सज्ज, फिचर्स आणि किंमत पहा

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

मंगळवार, २४ जानेवारी २०२३ रोजी सोन्याच्या दरांनी सर्वकालीन उच्चांक गाठला असून वायदे बाजारात सोन्याने ५७ हजार रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. आज व्यवहाराच्या सुरुवातीला सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर  सोन्याचा भाव आज ५७ हजार ०३० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून त्यात आज २१५ रुपयांच्या वाढीसह ०.३८ टक्क्यांची मजबूती दिसून येत आहे. तसेच आज व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत सोन्याने ५७ हजार ०४६ रुपयांपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली.

त्यात चांदीच्या दरातही आज तेजीने व्यापार होताना दिसत असून चांदीची किंमत गेल्या बंदच्या तुलनेत ३१६ रुपये किंवा ०.४६ टक्क्यांनी वाढून ६८ हजार २८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे.

सोने-चांदीच्या तेजीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने आणि चांदीच्या दरात तेजीने व्यवसाय होत आहे. आज कोमॅक्सवर सोन्याचा भाव ५.५५ डॉलर किंवा ०.३० टक्क्यांच्या वाढीसह १९३४.९५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत असताना चांदीची चमकही वाढली आहे. कोमॅक्सवर चांदी ०.४२ टक्क्यांनी वधारून २३.६५२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

ही NBFC FD वर देतेय जोरदार व्याज ,गुंतवणूकीतून मिळवू शकता जबरदस्त परतावा

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!