उद्योग / व्यवसाय

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; या दिवशी होऊ शकते महागाई भत्ता वाढीची घोषणा

Buisness Batmya

नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अखेर आनंदाचा क्षण आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (डीए वाढीव) निर्णय घेण्यात येणार असून, आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात ४० हजार रुपयांनी वाढ होणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर एआयसीपीआयच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ६ टक्के डीए वाढीवरून पडदा उचलण्यात आला आहे. त्याची आता ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

तसेच फेब्रुवारीपासून एआयसीपीआय निर्देशांकाचा डेटा सातत्याने वाढत असल्याने मे महिन्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे जुलैमध्ये महागाई भत्त्यात किमान ६ टक्के वाढ होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी एप्रिलनंतर मे महिन्याच्या एआयसीपीआय निर्देशांकात मोठी झेप वाढ झाली आहे. तर त्यात १.३ अंकांची वाढ होऊन ती १२९ अंकांवर पोहोचली आहे. तसेच जूनमध्ये जरी हा आकडा वाढला नसला तरी ६ टक्के महागाई भत्त्यात वाढ होईल यात शंका नाही.

Stock Market : शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 54 हजारांचा टप्पा पार

पगार किती वाढणार?

सरकारने डीए ६ टक्क्यांनी वाढवल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४% वरून ४०% होईल. त्याप्रमाणे कमाल आणि किमान मूळ वेतनात किती वाढ होईल ते पाहू-

कमाल मूळ पगाराची गणना- कर्मचार्‍यांचे मूळ वेतन ५६,९०० रुपये, नवीन महागाई भत्ता (४०%) २२,७६० रुपये/महिना, आतापर्यंत महागाई भत्ता (३४%) १९,३४६ रुपये/महिना, किती महागाई भत्ता २२,७६०-१९,३४६ = ३,४१४ रुपये/महिना, वार्षिक पगार वाढ ३,४१४ X१२= ४०,९६८ रुपये कमाल प्रमाणे आहे.
तर किमान मूळ पगाराची गणना- कर्मचार्‍याचे मूळ वेतन १८,००० रुपये, नवीन महागाई भत्ता (४०%) ७,२०० रुपये/महिना, आतापर्यंत महागाई भत्ता (३४%) ६,१२० रुपये/महिना, किती महागाई भत्ता वाढला ७२००-६१२० = १०८० रुपये/महिना, वार्षिक पगारात वाढ १०८० X१२ = १२,९६० रुपये अशा प्रमाणात आहे. तर याबाबत ३१ जुलैपर्यंत महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाऊ शकते. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पगारात यावेळी बंपर वाढ होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.

73 लाखांहून अधिक पेन्शनधारकांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी रक्कम!

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!