केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ

Buisness Batmya
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून हा भत्ता 1 जुलैपासून वाढण्यात येत आहे. तर आता एआईसीपीआई कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 39 टक्के होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 1 जुलैपासून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तसेच यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार हे जाणून घेऊया.Good news for central employees! Employees’ dearness allowance will be increased
तुम्ही निवृत्तीची योजना आखत असाल तर कोणती पेन्शन योजना सर्वोत्तम?
दरम्यान यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एआयसीपीआय निर्देशांकात घसरण झाली होती, मात्र त्यानंतर एआयसीपीआयचे आकडे वाढत आहेत. त्यानुसार जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 आणि मार्चमध्ये एक पॉइंट वाढून 126 झाला आहे. तसेच एप्रिलच्या आकडेवारीनुसार, AICPI निर्देशांक 127.7 वर आला असून यामध्ये 1.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे ही आकडेवारी जर 127 च्या पुढे गेली तर 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
डॉलरच्या तुलनेत रुपया 4.5 टक्कयांनी घसरला, सर्वसामान्यांना बसणार फटका