LIC IPO च्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, लवकरच कंपनी पहिल्या तिमाहीचा निकाल करणार जाहीर

Buisness Batmya
एलआयसी आयपीओच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच कंपनी आपल्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करणार आहे. तसेच यामध्ये गुंतवणूकदारांना डिव्हिडंट देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.Good news for LIC IPO investors, the company will soon announce its first quarter results
भारतात फक्त 10 टक्के लोक कमवितात महिना 25 हजार
दरम्यान एलआयसीचा आयपीओ साइज २०,५५७ कोटी रुपये होता. तर कंपनीचा मार्केट कॅप ५,२४,६२६.९३ कोटी रुपये आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत असली तरी एलआयसीकडून गुंतवणूकदारांना फायदा दिला जाऊ शकतो.
तसेच एफपीओ गुंतवणूकदारांनी लगोलग घेतला पाहिजे यासाठी आयपीओमध्ये पैसा लावणारे फायद्यात राहणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे याची काळजी घेऊनच एलआयसीच्या गुंतवणूकदारांना बंपर डिव्हिडेंट देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
अँजेल वनचे मुख्य सल्लागार अमर देव यांच्या मतानुसार, एलआयसीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितींमुळे नकारात्मक परिणाम दिसत आहे. ही एक मोठी आणि विश्वासार्ह कंपनी आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घ काळासाठी हे शेअर होल्ड करावेत. कारण येत्या काही वर्षांत चांगल्या व्यवसायाची शक्यता आहे.
खाद्यतेलाच्या दरात इतक्या रुपयांनी घसरण