ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! एफडीसह अनेक बचत योजनांच्या व्याजदरात वाढ
Buisness Batmya
नवी दिल्लीः स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. ने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि पोस्ट ऑफिस मुदत ठेव यांच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Share Market: भारतीय शेअर बाजार तेजीत सुरूवात, सेन्सेक्स पुन्हा 61 हजारांच्या वर
मोठ्या संख्येने लोक लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांच्या या आवडत्या गुंतवणूक योजना आहेत. चांगले व्याज, कर सूट आणि पैसे बुडण्याचा धोका नसल्यामुळे या योजना खूप लोकप्रिय आहेत. आता 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पोस्ट ऑफिस एफडी घेण्यावर अधिक व्याज मिळणार आहे.
तर जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा (SCSS) व्याजदर 8 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी ७.६ टक्के व्याजदर होता. ज्येष्ठ नागरिक किमान 1,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास, ज्येष्ठ नागरिकांना आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते.
Today Gold Price सोने झाले महाग, जाणून घ्या आजचे नवीन दर
तसेच 1 वर्षाच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेवीवर 5.5 टक्क्यांऐवजी आता 6.6 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, 2 वर्षांच्या एफडीवरील व्याज 5.7 टक्क्यांवरून 6.8 टक्के करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता 3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटसाठी 6.9 टक्के दराने व्याज दिले जाईल. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट 5 वर्षात मॅच्युअर झाल्यावर आता 7% व्याज मिळेल. किसान विकास पत्र (KVP) चा व्याज दर देखील 6.8 टक्क्यांवरून 7 टक्के झाला आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम चा व्याज दर 6.7 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला आहे. तसेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदर जानेवारी-मार्च तिमाहीसाठी 6.8 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे.