उद्योग / व्यवसाय

करदात्यांना मोठी खूशखबर, आता इतक्या लाखापर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त

Buisness Batmya

सध्या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. तर वित्तमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामधून प्राप्तीकर भरणाऱ्या करदात्यांना खूशखबर दिली असून करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे.

या कंपनीची कार घेणे होणार महाग

तसेच आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार असून हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.                त्यात उत्पन्न प्राप्तिकर- 0 ते तीन लाख 0 टक्के, 3 ते 6 लाख 5 टक्के, 6 ते 9 लाख 10 टक्के, 9 ते 12 लाख 15 टक्के, 12 ते 15 लाख 20 टक्के, 15 लाख हून अधिक 30 टक्के कर आकरण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झाला नसून सरकारकडून टॅक्सबेस वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आयकर रिटर्न दाखल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने टॅक्स स्लॅब वाढवला तर करदाते वाचणाऱ्या पैशातून खरेदीकडे, गुंतवणुकीकडे वळणार असल्याने याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ज्ञांनी व्यक्त केला.

Facebook वर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी, अन्यथा..

त्यात सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. आणि ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो. तसेच प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देत आहे. त्यामुळे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असणा-यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. पण ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही.

तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजने अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे. तसेच महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार असून दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येऊन 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.

Honda Activa ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार्ज झाल्यावर 120KM धावणार, किंमतही कमी

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!