अँड्राइड स्मार्टफोनच्या अॅप्सबाबत Google’ चा मोठा निर्णय
Buisness Batmya
गुगलने आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली असून गुगलच्या या निर्णयामुळे अँड्राइड वापरकर्त्यांची चांदी होणार आहे. तसेच देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम असून त्यात आपण नवा मोबाईल खरेदी केल्यास त्या मोबाईलमध्ये अगोदर काही अॅप्स इन्स्टॉल असतात. ते अॅप्स आपल्याला काढून टाकता येत नाहीत. पण, आता गुगलने आपल्याला हवे ते अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहेत, आणि नको असलेले अॅप्स काडून टाकता येणार आहेत.
या फुलाची शेती करून करू शकता भरघोस कमाई
त्यामुळे आता आपल्याला आपल्या मर्जीने अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहे, तसेच आपल्या फोनमध्ये आपण कोणत्या सर्च इंजिनचा वापर करणार यावरही मोठी निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत गुगलच्या काही अटी होत्या. तसेच आपल्या मोबाईलमध्ये गुगलने Google Chrome, Gmail, Goodgle Drive, Google Map, Google Meet असे अॅप्स पहिल्यांदाच इन्स्टॉल होती, हे अॅप्स गुगल काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात.
सॅमसंग यूजर्सना मोठा झटका, सरकारने दिला इशारा, हे काम लगेच करा
काही दिवसापूर्वीच गुगलला भारताने मोठा दंड ठोठावला होता. CCI ने गुगल विरोधात कारवाई केली असून यात गुगलवर मनमानीचा आरोप लावण्यात आला होता. यात भारताने गुगलवर १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. पण या निर्णयाविरोधात गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, या प्रकरणात गुगलला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूट दिलेली नाही.
तर सीसीआयच्या निर्णयानंतर गुगलने यू-टर्न घेत आपल्या जुन्या अटी व शर्ती बदलल्या आहेत. गुगल भारतात चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप न्यायालयाने केला.
LIC ची धांसू योजना, तुम्हाला हमी परताव्यासह अनेक जबरदस्त फायदे मिळणार