लाईफस्टाईल

आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअरलीडर्सना किती मानधन मिळतं?

सुरुवात झाल्या क्षणापासून जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आयपीएलची तुफान चर्चा पाहायला मिळाली आहे. खेळाडूंची अफलातून खेळी असो, त्यांच्यावर लावली जाणारी कोट्यधींची बोली असो किंवा मग या आयपीएलमुळं नावारुपास येणारे चेहरे असो, चर्चा व्हायला फारसा वेळ लागत नाही.

या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात. 2020 म्हणजेच कोविड काळापासून मात्र या चीअरलीडर्स मैदानात दिसलेल्या नाहीत. यंदाही त्यांच्या दिसण्याची शक्यता जवळपास नाहीच.

हातात रंगीबेरंगी झिरमिळ्या असणारे गोंडे घेऊन नाचणाऱ्या या चीअरलीडर्सही नकळतपणे आयपीएलची ओळख आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुम्हाला माहितीये का त्यांना किती मानधन मिळतं?

पंजाब, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादच्या संघाकडून चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी साधारण 150 डॉलर्स मिळतात.

सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय चलनानुसार ही रक्कम प्रत्येक सामन्यासाठी 12300 रुपये इतकी असते.
राजस्थानच्या संघाकडून चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी 180 डॉलर्स म्हणजेच 14800 रुपये मानधन मिळतं.

बंगळुरू आणि मुंबईच्या संघाकडून चीअरलीडर्ससाठी प्रत्येत सामन्याला 250 डॉलर्स म्हणजेच 20500 रुपये मोजले जातात. कोलकाता संघाकडून चीअरलीडर्सना सर्वाधिक मानधन दिलं जातं. हा आकडा 300 डॉलर्स म्हणजेच 24700 रुपयांच्या घरात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!