उद्योग / व्यवसाय

ICICI बँकेचा ग्राहकांना झटका, आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदरात वाढ

Buisness Batmya

नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या ICICI बॅंकने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा या बँकेने कर्जदर वाढवले आहेत. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना बँकांनीही कर्ज वाढ केल्याचा दुहेरी फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.ICICI Bank shocks customers for second time in a week

रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर वाढीनंतर आता सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने बाह्य घटकांवर आधारित ‘आय-ईबीएलआर’ (कर्जदर) ०.५० टक्क्यांनी वाढवला आहे. या व्याजदर वाढीनंतर बँकेचा बाह्य घटकांवरील कर्जदर ८.६० टक्के झाला आहे.

Stock Market :शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 214.85 अंकांनी घसरला

दरम्यान आयसीआयसीआय बँकेने १ जून २०२२ रोजी एमसीएलआरवर आधारित कर्जाचे सुधारित व्याजदर जाहीर केले होते. पण आता बँकेने दुसऱ्यांदा कर्जदर वाढवल्याने सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहे. त्यात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जे तसेच व्यावसायिक कर्जांच्या मासिक हप्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

तसेच बाह्य घटकांवरआधारित एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट ०.५० टक्क्यांनी वाढला असून, तो आता ८.६० टक्के झाला असल्याचे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. आता सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे.असा महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. या व्याजदर वाढीने गृह कर्जासह सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत.

क्रेडिट कार्ड युजर्ससाठी आनंदाची बातमी, रिझर्व बँकेतर्फे लवकरच सुरू करणार ही सेवा

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!