टेक

जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर सावधान!

buisness batmya

मुंबई : आजकाल आपण पाहतो ब-याच लोकांना ऑनलाइन शॉपिंग करायला फार आवडते. त्यामुळे आजच्या युगात लोकांकडून ऑनलाइन शॉपिंगलाच खूप पसंती मिळत असल्याचे दिसते . त्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लोकांनी बरीचशी शॉपिंग ऑनलाईनच केली आहे. तशीच तुम्हाला देखील ऑनलाइन शॉपिंग करण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे.If you are shopping online, beware!

तुम्हाला आम्‍ही अशाच एका चुकीबद्दल सांगणार आहोत जी करणं तुम्ही टाळलं पाहिजे. कारण या चुकीमुळे तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. जसे बरेच लोक ऑनलाइन शॉपिंग करताना त्याचा रिव्ह्यू वाचतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर अनेक फेक रिव्‍युज् दिसतात, ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते.

या बॅंकेत खाते असणा-यांना होणार 5 लाखांपर्यंत फायदा

त्यानंतर आजकाल एक ऑनलाइन शॉपिंग घोटाळा सुरू आहे, ज्यामध्ये सर्व शॉपिंग वेबसाइटवर अनेक उत्पादनांचे चुकीचे रिव्यू दिले जातात. यामद्ये Amazon आणि Flipkart सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या घोटाळ्यापासून तुम्ही थोडे सावध राहून या घोटाळ्यात अडकण्यापासून स्वत:ला वाचवू शकता.

तसेच आम्ही तुम्हाला काही टूल्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही शॉपिंग साइटवरील कोणते रिव्ह्यू खोटे आहेत आणि कोणते खरे आहेत हे ओळखू शकणार. यामधे आम्ही ReviewMeta, Fakespot आणि The Review Index सारख्या Chrome एक्स्टेंशनबद्दल बोलत आहोत, जे तुम्हाला बनावट वस्तु किंवा रिव्यू ओळखण्यात मदत करणार आहे.

(Share Market 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांचा झालाः1 लाखाचे झाले 35 लाख

त्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर Chrome उघडून वरील कोणतेही एक्टेंशन डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला जे उत्पादन घ्यायचं आहे, त्या पृष्ठावर जा आणि उत्पादनाची URL कॉपी करा. आणि मग त्या क्रोम एक्स्टेंशनवर जाऊन लिंक पेस्ट करा. तुम्हाला लगेच रिव्हूज चेक करून , तुम्हाला येथे मूळ रिव्हूज दिसणार आहे. अशा प्रकारे, तुम्ही खोट्या किंवा बनावट रिव्हूजना बळी पडणार नसून महाग उत्पादने हे खोटे रिव्हूज वाचून खरेदी करणार नाही.

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!