वाहन मार्केट

कार खरेदीचा विचारात असाल तर महिंद्राच्या या नव्या कारबद्दल जाणून घ्या

Buisness Batmya

बाजारात सध्या एका नवी आकर्षक कार दाखल झाली असून त्याकडे सगळ्याचेच लक्ष वेधून गेले आहे. कारण देशातील सर्वात लोकप्रिय SUV पैकीच एक महिंद्राची XUV 700 आहे. त्यामुळे महिंद्राने आपल्या नव्या लोगोसह XUV 700 बाजारात दाखल केली आहे. तसेच ही कार लॉंच झाल्यापासूनच XUV 700 ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. चला तर जाणून घेऊया काही खास गोष्टी.If you are thinking of buying a car, find out about this new car from Mahindra

दरम्यान महिंद्राची ही कार लॉंच होताच या कारला विक्रमी बुकिंग मिळालं आहे. त्यामुळे या कारच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन लावता येईल की कार बुकिंगचा वेटिंग पीरियड तीन महिन्यांपासून एका वर्षापर्यंत इतका आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार सध्या XUV 700 चा बॅकलॉग तब्बल ७८००० यूनिट्सपर्यंत पोहोचला असल्याचं Mahindra कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळे दर महिन्याला तब्बल १० हजार XUV 700 कारचं बुकिंग होत आहे.

भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला

तसेच महिंद्रा XUV 700 नं बाजारात चांगलाच जम बसवला असून कार लॉंच झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १.७ लाख युनिट्स रजिस्ट्रेशन झाल आहे. या कारच्या पेट्रोल व्हर्जन MX सर्वात कमी म्हणजेच तीन महिन्यांचा वेटिंग कालावधी आहे. तर डिझेल व्हर्जन AX7 चा वेटिंग कालावधी तब्बल एक वर्ष इतका पोहोचला आहे. त्यामुळे जर तुम्ही Mahindra XUV 700 डिझेल AX7 एकदा बुक केली की ती तुमच्या हातात येण्यासाठी तुम्हाला तब्बल १ वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

या कारची ऑटोमॅटीक व्हेरिअंट XUV700 AX5 पेट्रोल ऑटोमॅटीकची डिलिव्हरी जवळपास सहा महिन्यांनी मिळत आहे. यानंतर AX5 डिझेल व्हेरिअंटचा नंबर लागतो. ब-याच जागी AX5 डिझेल व्हेरिअंट मॉडलचा वेटिंग कालावधी ८ महिन्यांच्या आहे. तर पेट्रोलच्या तुलनेत डिझेल व्हेरिअंटचा वेटिंग कालावधी अधिक आहे. त्यामुळे  XUV700 MX एसयूव्हीचे डिझेल व्हेरिअंट 155hp च्या दमदार 2.2 लीटर इंजिनसह उपलब्ध आहे. तर याचं पेट्रोल व्हेरिअंट 200hp च्या क्षमतेसह २.० लीटर टर्बोचार्ज्ड पावरप्लांट इंजिनसह उपलब्ध आहे. त्यामुळे या कारच्या टॅाप मॉडल XUV700 AX7 L बाबत बोलायचं झालं तर बाजारात या कारची मोठी मागणी आहे.

जबरदस्त लूकसह 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच, पहा किंमत

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!