व्हॉट्सॲप अपडेट करण्यासाठी तुम्हाला असे काही नोटिफिकेशन येत असेल तर सावधान!
Buisness Batmya
तुम्ही जर व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. काही असे व्हॉट्सॲपचे ॲप आहेत ते जर तुम्ही घेत असाल तर सावधान त्यातून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. तसेच व्हॉट्सॲप अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा, कारण ते बनावट असून त्याद्वारे दुसऱ्याच कंपनीचे बनावट ॲप डाऊनलोड होऊ शकते. चला तर याबाबत जाणून घेऊया.
व्हॉट्सॲपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी टि्वटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. त्यात कोणतेही नवीन व्हर्जन सध्या व्हॉट्सॲप युझर्सनी वापरू नये, अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हुबेहूब व्हॉट्सॲपसारख्या सेवा देणारे ॲप कंपनीच्या सुरक्षा संधोधन टीमला आढळले आहेत.
टाटा समूहाच्या या शेअरचे झाले एक लाखाचे 14 लाख
दरम्यान व्हॉट्सॲपचे हे फेक ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण, काही मेसेज पाठवून, मेल पाठवून अपडेट्सची लिंक तुम्हाला दिली जाते आणि त्याद्वारे सहज फसवणूक होते. त्यामुळे आपले व्हॉट्सॲप ॲप अपडेट करायचे असेल तर केवळ व्हॉट्सॲपची अधिकृत वेबसाइट किंवा प्ले स्टोअरवरूनच ते करावे.
तसेच इतर कोणत्याही वेबसाइटचा यासाठी आधार घेऊ नये कारण जगभरात २ अब्ज एवढे व्हॉट्सॲपचे सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यात १०० अब्ज मेसेजेस रोज पाठवले जातात. तसे प्रत्येक युजर ३८ मिनिटे व्हॉट्सॲप वापरतो आणि ३९ कोटी व्हॉट्सॲप युजर्स भारतात आहेत.
त्यामुळे हेमॉड्स या डेव्हलपर कंपनीने ‘हे व्हॉट्सॲप’ नावाचे ॲप तयार केले आहे. ते धोकादायक असून, त्याचा फटका लोकांना बसू शकतो, असे मूळ व्हॉट्सॲप कंपनीचे म्हणणे आहे. आणि हे नवे बनावट ॲप युझर्सना नवनवे फिचर्स देण्याचे अमिष दाखवून त्याद्वारे युझर्सची पर्सनल माहिती चोरली जाऊन, डेटाही घेतला जातो.
Stock Market : शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 54 हजारांचा टप्पा पार