तुम्हालाही ‘असा’ मेसेज आला असल्यास आणि तुम्ही क्लिक केल्यास तुमचा घातं झालाचं

Bussness batmya
मुंबई हॅकर्स देखील इंटरनेट युजर्सच्या डिव्हाइसेसमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळवून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. अशात इंटरनेटवर फिशिंग स्कॅम्समुळे देखील अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशात सावधगिरी न बाळगल्यास एका क्लिकवर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सुविधा तर वाढल्याच आहे. पण, दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम देखील पाह्यला मिळत आहे. गेल्या काही काळात ऑनलाईन फ्रॉड्सच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.
आता काही खरे नाही आज पुन्हा वाढले पेट्रोल डिझेल…लिटरचा भाव झाला एवढा
फिशिंग स्कॅम्स आता अगदी सामान्य झाले असून नुकतेच SBI ने अशाच एक फिशिंग मेसेज बाबत ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हे फिशिंग मेसेज प्रकरण नक्की काय आहे.? यात ग्राहकांना कशा पद्धतीने टार्गेट बनविले जात आहे ? आणि जर असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घ्या सविस्तर.
भारतात सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा, वाहन उद्योगाला मोठा फटका
SBI ग्राहकांना येतोय हा मेसेज: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना सध्या Alert राहण्याची गरज आहे. लोकांना या स्कॅममध्ये अडकवण्यासाठी फ्रॉडस्टर स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना त्यांचा पॅन नंबर अपडेट करण्यासाठी एसएमएस पाठवत आहेत. ज्यामध्ये, बनावट लिंक देण्यात येत आहे. लिंकवर क्लिक करताच ती लिंक तुम्हाला तुमचे डिटेल्स विचारणाऱ्या बनावट SBI वेबपेजवर घेऊन जाईल आणि हॅकर मिनिटांत तुमचे रिकामे अकाउंट रिकामे करेल. ही फसवणूक कशी टाळता येईल हे सविस्तर जाणून घ्या.
10 हजारांची गुंतवणूकीतून 7 लाखांचा फंड
येथे करा तक्रार: बँकेने सांगितले आहे की, त्यांची आयटी सुरक्षा टीम यावर योग्य ती कारवाई करेल. पुढे, SBI ने ग्राहकांना ईमेल/ एसएमएस /कॉल/ एम्बेडेड लिंक्सना प्रतिसाद न देण्याचा सल्ला दिला आहे. ग्राहकांनी त्यांचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करू नयेत. बँका सहसा कोणताही OTP मेसेज किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. SBI ग्राहकांना अशा फिशिंग मेसेजची तक्रार report.phishing@sbi.co.in या ईमेल आयडीवर करण्याचा सल्ला देत असून ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधू शकतात.
Stock market या दोन शेयर्समुळे झुनझुवालांना मिळाले बेफाम पैसे
फसवणूक टाळण्यासाठी एसबीआयने दिला हा सल्ला: तुम्ही जर SBI ग्राहक असाल तर तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचेही मोठे नुकसान होऊ शकते. ही फसवणूक टाळणे शक्य आहे. त्यामुळे SBI आपल्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अज्ञात मेसेज लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला देत आहे. लिंकवर क्लिक केल्यास आणि कोणतीही संवेदनशील माहिती टाकल्यास तुमचे पैसे चोरी जाऊ शकतात .
SBI फिशिंग मेसेज काय आहे ? SBI ग्राहकांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला जात आहे. दिलेल्या लिंकवर त्यांचा पॅन क्रमांक अपडेट न केल्यास त्यांचे ‘YONO’ Account ब्लॉक केले जाईल असे यात सांगण्यात येत आहे. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे YONO हे SBI चे डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. मेसेजमध्ये दिलेली बनावट लिंक Fake एसबीआय पेजवर जाते. जी युजर्सना संवेदनशील माहिती एंटर करण्यास सांगते. जेव्हा युजर्स त्यावर त्यांचे डिटेल्स एंटर करतात तेव्हा त्यांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि ते तुम्हाला फसवणुकीचे बळी बनवतात.