उद्योग / व्यवसाय

समृद्धी महामार्गावर घटणार अपघाताचा ‘इम्पॅक्ट’; शिर्डी ते भरवीर या टप्प्यात नवी प्रणाली

 

मुंबई : समृद्धी महामार्गावरअपघातांची मालिका सुरूच असून, अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात आता ‘इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर’ या अत्याधुनिक प्रणालीची भर पडणार आहे. अपघाताची तीव्रता कमी करणारी ही प्रणाली असून, भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अनोख्या योजनेचा अवलंब समृद्धी महामार्गावर केला जाणार आहे.

कुठे बसवणार?
– शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंतचा ८० किमी लांबीचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
– या टप्प्यात इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर बसविण्याचे काम सुरू आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पट्ट्यातही इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर प्रणाली बसवली जाणार आहे.

काय आहे इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर?
– वाहनाच्या धडकेमुळे वाहने आणि वाहनचालकांना होणारे नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने इम्पॅक्ट ॲटेन्यूएटरची निर्मिती करण्यात आली आहे.
– अपघातावेळी आदळणाऱ्या वाहनाची गतीज ऊर्जा इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर शोषून घेते.
– त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी होऊन अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी सुरक्षित राहतील.
– ७०१ किमी लांबीच्या संपूर्ण समृद्धी महामार्गावर टप्प्याटप्प्याने ही प्रणाली स्थापित केली जाणार आहे.

इम्पॅक्ट ॲटेन्यूएटर प्रणाली एक प्रकारचे शॉक ॲब्झॉर्बरचे काम करेल. त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
– संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!