केंद्रीय कर्मचा-यांसाठी महत्वाची बातमी, 7 व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात वाढ

Buisness Batmya
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांसाठी मोठी महत्वाची बातमी आहे. 7 व्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली असून सरकारने 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही भेट असणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे.Important News for Central Employees, Increase in DA under 7th Pay Commission
तसेच वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘5व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर 6व्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए 196 टक्क्यांवरून 203 टक्के करण्यात आला आहे. यानुसार 7 टक्के ने वाढ झाली असून या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभही जानेवारी 2022पासून लागू करण्यात आला आहे.
दरम्यान आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता. कारण केंद्रीय विभाग किंवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगात अद्याप समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. परंतु वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7 ते 13 टक्क्यांपर्यंत एकरकमी डीएचा लाभ मिळू लागला असून कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ करण्यात आली आहे.
Share Market: शेअर बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आजचे दमदार 10 शेअर्स