पुढचे तीन तास महत्त्वाचेःहवामान अपडेट

मुंबईत काही भागात पावसाला (Rain ) सुरुवात झाली आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबईतही सकाळपासून पाऊस पडत आहे. ( Weather Updates ) मुंबईच्या दक्षिण भागात दादर, परेलमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.
बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुळ्यात धुमाकूळ घातलाय. धुळे जिल्ह्यातल्या तुफान गारपिटीमुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसलाय. सर्वाधिक नुकसान धुळे जिल्ह्यात झाले आगे. जवळपास 3 हजार 144 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जळगावात मोठं नुकसान झालंय.
रावेर, यावल, भुसावळ तालुक्यात केळी, गहू, मका पिकाला मोठा फटका बसलाय. ऐन ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. पालकमंत्री गिरीश महाजन धुळे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुळे जिल्ह्याला झोडपलंय..
शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी गिरीश महाजन करणार आहेत.. उभं पिक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदील झालाय… तेव्हा पालकमंत्री कोणती घोषणा करताय याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.