टेक

या कंपनीच्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ

Buisness Batmya

सध्या अनेक कंपन्या आपल्या प्लॅन्समध्ये बदल करताना दिसत आहे. त्यात देशभरात प्रत्येकजण नेटवर्कचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतो, त्यामुळे युजर्स वेगवेगळ्या प्लानच्या शोधात असतात. त्यातच खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वीआयने वेळोवेळी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली असून सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ठराविक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती. मात्र, आता कंपनीने आपल्या प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स कमी करत ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासा

BSNL ने आपल्या तीन प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स कमी केली असून कंपनीने प्लॅन्सच्या किंमतीत वाढच केली आहे. यामध्ये BSNL ने २९ रुपये, ४९९ रुपये आणि ७९९ रुपयांच्या प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स कमी करून ९९ च्या प्लॅन्सची वैधता २४ दिवसांवरून १८ दिवस केली आहे. त्यामुळे या प्लान महाग होणार आहे. चला तर जाणून घेऊया BSNL चे तीन प्लॅन्स ज्यात वाढ झाली आहे.

BSNL चा २६९ रुपयांचा प्लॅन- या २६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळणार असून देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा, बीएसएनएल ट्यून, Eros Now चे सबस्क्रिप्शन आणि इतर बेनिफिट्स मिळतील.    BSNL चा ४९९ रुपयांचा प्लॅन- या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटासह देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात असून यात BSNL ट्यून, Zing आणि गेमिंग बेनिफिट्स मिळणार.तसेच या प्लॅनमध्ये ७५ दिवसांची वैधता दिली जाते.

BSNL चा ७६९ रुपयांचा प्लॅन- या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात. तसेच या प्लॅनमध्ये आधी ९० दिवसांची वैधता दिली जात होती. परंतु, आता ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे.

BSNL एअरटेल आणि जिओला टक्कर देणार

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!