टेक

Infinix चा स्वस्तात मस्त लॅपटॅाप लवकरच येतोय बाजारात, पहा किंमत

Buisness Batmya

Infinix भारतात आपला नवीन InBook X1 Slim लॅपटॉप लाँच करणार आहे, जो कंपनीचा सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे. तर कंपनीने गेल्या वर्षीच या Infinix InBook X1-Series ची सुरुवात केली होती. त्यातच आता हा नवीन लॅपटॅाप येत असून पुढच्या आठवड्यात भारतीय ग्राहकांच्या सेवेत दाखल होईल, असं इनफिनिक्स इंडियानं सांगितलं आहे.Infinix’s cheapest cool laptop coming to market soon, see price

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Infinix InBook X1 Slim सेगमेंट लिडिंग फीचर्ससह भारतात 15 जूनपर्यंत लाँच होईल. तसेच Infinix InBook X1 Slim 14.88mm जाड असेल आणि याचे वजन 1.24kg असेल. त्यामुळे हा प्राईस सेगमेंटमधील सर्वात हलका आणि पातळ लॅपटॉप ठरू शकतो. हा लॅपटॉप ऑल-मेटल बॉडीसह रेड, ग्रीन, ब्लू आणि ग्रे कलरमध्ये सादर होणार असून ज्यात मोठी बॅटरी आणि टाइप-सी पोर्ट मिळेल.

मीडिया रिपोर्टनुसार हा जागतिक बाजारात आलेल्या Infinix InBook X2 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे जागतिक बाजारात या लॅपटॉपची किंमत 30 हजारांपासून सुरु होते.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स जोराने कोसळले

Infinix InBook X2 चे स्पेसिफिकेशन्स

या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा फुलएचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेश्यो 16:9 आणि पीक ब्राईटनेस 300 निट्स आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड Wi-Fi 802.11 ab/b/g/n/ac, Bluetooth v5.1, दोन USB Type-C पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, HDMI 4.1 पोर्ट, SD कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

Infinix InBook X2 चे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. यात Intel Core i3-1005G1 प्रोसेसर, Intel Core i5-1035G1 आणि Intel Core i7-1065G7 प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. हे लॅपटॉप 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह विकत घेता येतील. Infinix InBook X2 सीरीजमध्ये लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. तसेच या लॅपटॉपमध्ये 50Wh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जला सपोर्ट करत असून  11 तास वेब ब्राउजिंगला सपोर्ट करते.

मोदी सरकारने PMSBY चे नियम बदलले

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!