महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलचे दर पेटले…Petrol-diesel prices
Bussness batmya
मुंबईः Inflation erupts! Petrol-diesel prices skyrocket : मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 117.57 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 101.70 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलची किंमत आता 102.61 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 93.87 प्रतिलीटरवर पोहोचली आहे.
चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर 22 मार्चपासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम आहे. त्यानंतर गेल्या 12 दिवसांत इंधन दहाव्यांदा पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. अलिकडे कच्च्या तेलाच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील 85 टक्के इंधन पुरवठा आयातीवर अवलंबून आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर एक दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. 31 मार्चला पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागले होते.
मुंबई
पेट्रोल – 117.57 रुपये प्रति लिटर
डिझेल – 101.79 रुपये प्रति लिटर
दिल्ली
पेट्रोल – 102.61 रुपये प्रति लिटर
डिझेल – 93.87 रुपये प्रति लिटर
कोलकाता
पेट्रोल – 112.19 रुपये प्रति लिटर
डिझेल – 97.02 रुपये प्रति लिटर
कोणत्या दिवशी किती वाढले दर?
22 मार्च – 80 पैसे
23 मार्च – 80 पैसे
25 मार्च – 80 पैसे
26 मार्च – 80 पैसे
27 मार्च – 50 पैसे
28 मार्च – 30 पैसे
29 मार्च – 80 पैसे
30 मार्च – 80 पैसे
31 मार्च – 80 पैसे
02 एप्रिल – 80 पैसे
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चच्या मते, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9 ते 12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.