मोबाईल

iPhone 14 Pro Max फक्त एवढ्या रुपयात!

मुंबई : आयफोन वापरण्याची किंवा बाळगण्याची एक वेगळीच मजा आहे. पण हा स्मार्टफोन खिशाला परवडेल असं नाही. त्यामुळे अनेक जण सवलतीच्या दरात मिळेल की नाही याची वाट पाहात असतात. जर तुम्हाला सांगितलं की, आयफोन 14 प्रो मॅक्स तुमच्या बजेटमध्ये आहे. तर तुमचा विश्वास बसणार नाही.

असं असलं तरी तुम्हाला हा फोन स्वस्तात घेण्याची संधी चालून आली आहे. तसंच पाहिलं तर आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत दीड लाखांच्या घरात आहे. पण हा फोन तुम्ही 16500 रुपयात खरेदी करू शकता. नेमकी काय आणि कुठे आहे ऑफर जाणून घेऊयात

अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावर काही टक्के सवलत मिळेल. त्या तुलनेत फ्लिपकार्टवरून विकत घेण्यासाठी ऑफरमध्ये कमी किंमतीत मिळेल. पण आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत 16500 नक्कीच नसेल.

या किमतीत तुम्ही हा फोन फेसबुक मार्केट प्लेसवरून खरेदी करू शकता. फेसबुक मार्केट प्लेसवर नुकतीच जाहीरात पोस्ट करण्यात आली आहे. यात स्मार्टफोनची किंमत 16500 इतकी आहे.

जाहीरात देणाऱ्या युजर्सने दावा केला आहे की, आयफोन 14 प्रो मॅक्स (मेड इन थायलँड) फक्त 16500 रुपयात विकत घेऊ शकता. माहितीनुसार, युजर्सकडे आयफोनचा बंपर स्टॉक आहे. त्यामुळेच आयफोनवर मोठी सवलत दिली जात आहे.

अ‍ॅपल आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये 6.7-इंचाचा सुपर XDR OLED डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 2796×1290 पिक्सेल इतके आहे. अ‍ॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये A16 Bionic चिपसेट देण्यात आली आहे. ही चिपसेट 6 कोर सीपीयुवर परफॉर्म करतो. या स्मार्टफोनमध्ये 128GB, 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत स्टोरेज क्षमता मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!