पेट्रोल आज स्वस्त झाले की महाग?

business batmya
दोन दिवसांपूर्वी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहोचली होती. मात्र पुन्हा एकदा कच्चा तेलात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान बुधवारी (9 नोव्हेंबर) सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $ 88.72 वर होताना दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 95.36 वर पोहोचले. (today petrol diesel price update)
दिलासा
ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलात अस्थिरता कायम आहे. तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून तेलात प्रति लिटर 40 पैसे सवलत देणे अपेक्षित होते. मात्र कंपन्यांनी तसे केले नाही. पाच महिन्यांहून अधिक काळ देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात (petrol diesel rate) कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल स्वस्त झाले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पेट्रोल आणि डिझेलचे दर (petrol diesel price) पाच महिन्यांहून अधिक काळ स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात (maharashtra petrol diesel price) तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला परिणामी किंमती खाली आल्या.
शहर आणि तेलाच्या किमती
– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर