उद्योग / व्यवसाय

Job trick 55 हजार पदे भरणार ही कंपनी, पगार पण चांगला

business batmya

नवी दिल्ली:

Job trick सध्या अनेक तरुणांचे शिक्षण झालेला आहे आणि त्यातल्या त्यात अनेक मुलं जे आहेत ते इंजिनिअरिंग क्षेत्रांमध्ये पदवीप्राप्त आहेत मात्र त्यांना नोकरी मिळत नसल्याने जबाबदारी आणि नोकरी न मिळण्याचे संकट यामुळे त्यांची परिस्थिती एकदम हालाखीची झाली आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा थैमान सुरू आहे आणि यामध्ये अनेकांना अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. मात्र एवढा असतानाही आयटी क्षेत्रातल्या कंपन्या मात्र आपल्या वेगामध्ये सुरू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आयटी क्षेत्रातील कंपन्या अनेक पद्धतीने भरती प्रक्रिया करत आहे आघाडीचे असलेली एक आयटी कंपनी Infosys आता 55 हजार नोकऱ्या देणार वृत्त समोर आलं आहे.

एवढी करणार भरती 

IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी नीलांजन रॉय यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर इन्फोसिस भर देत आहे. ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी ५५ हजार किंवा यापेक्षा अधिक भरती करणार आहे. तसेच याला आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे.

महिलांची संख्या ३९ टक्के

महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. Infosys कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसंबर २०२० मध्ये इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ होती. ती वाढून डिसेंबर २०२१ मध्ये २ लाख ९२ हजार ०६७ इतकी झाली आहे.  ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या कंपन्यांना प्रचंड चांगला नफा झाल्याचे सांगितले जात आहे. Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, TCS, Infosys आणि Wipro यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केले आहेत.

कर्मचारी संख्येबाबत बोलायचे झाले तर, TCS मध्ये आताच्या घडीला ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये महिलांची संख्या २ लाखांवर आहे. तसेच Wipro मध्ये २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत. कमाई बाबत बोलायचे झाल्यास  TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपये, तर Wipro ने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा कमावला.

नोकरीचा शोध घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. त्यातल्या त्यात आयटी क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना एक नामी संधी चालून आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी कंपन्या आपल्याकडील अनेकविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. लवकरच येत्या काळामध्ये ही भरता होईल असे वृत्त आहे त्यामुळे आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी ही सोनेरी संधी म्हणावी लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!