मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर तुम्ही करू शकता KIA च्या नवीन कार ‘CARENS MPV’ चे बुकिंग

BUISNESS BATMYA : MUMBAI : KIYA (किया) म्हणजेच कोरियन ऑटोमोबाईल कंपनी लवकरच भारतात आपले NEW MODEL लॉंच करणार आहे. या मॉडेलचे नाव आहे ‘CARENS MPV’
कंपनीने अलीकडेच कॅरेन्स MPV च्या बुकिंगची घोषणा केली , १४ जानेवारी २०२२ रोजी म्हणजेच मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर तुम्ही कियाच्या नवीन गाडीचे बुकिंग करू शकता. कियाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला आहे. स्टायलिश लुक, अट्रॅक्टिव्ह फीचर आणि नवीन टेकनॉलजी याचा सुरेख मेळ कियाने ग्राहकांसाठी आणला आहे.
या कारची विशेषता म्हणजे गाडीच्या पुढील भागात वाघाच्या चेहऱ्याची रचना केली आहे. त्यामुळे ही गाडी इतरांपेक्षा पाहताक्षणी वेगळी दिसेल. तिच्या पुढील वाघाचा चेहरा एक मस्त युनिकलुक देतो.
या मॉडेलची अजून एक खासियत म्हणजे हे मॉडेल चार प्रकार मध्ये लाँच होत आहे. प्रेस्टीज , प्रेस्टीज प्लस लक्झरी प्लस आणि प्रीमियम, या प्रत्येकाची वेगवेगळी खासियत आहे. लहान आणि मोठया अश्या दोन्ही कुटुंबाचा विचार करता किया कंपनीने या मॉडेलसमध्ये आपणास ५ सीटर ते ७ सीटर असे पर्याय उपलध्द केले आहे.
किया कॅरेन्सने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध तंत्रन्यानाचा वापर केला आहे. यात वायरलेस फोन चार्जिंग, एअरबॅग्ज, केमेरा ,नेव्हिगेशन बोर्ड अशा विविध माध्यमांचा समावेश आहे, जे ग्राहकांना नक्कीच आकर्षित करतील.
किया कंपनीने जसा लेटेस्ट लुक आणि टेकनॉलॉगचा विचार केला आहे. तसेच कियाचे सेफटी फिचर ही तुम्हाला आकर्षित करतील. ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, स्टीयरिंग व्हील, अँटी लॉक ब्रेकिंग मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, असे अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.
किया या MPV मध्ये १.५ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देऊ शकते. यासोबतच डिझेल इंजिनमध्ये १.५ लीटर डिझेल इंजिनही दिले जाऊ शकते. जे ११५ bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करू शकते. यामुळे किया चे नवीन मॉडेल नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल.