महाराष्ट्र

सरकारकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये होणार बदल, घ्या जाणून

buisness batmya

मुंबई : सध्या देशभरात अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्वाची मोठी बातमी आणली आहे. त्यात आता सरकारडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत असल्याने मोफत रेशन देण्याच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे. तसेच राज्य सरकारांशी याबाबत अनेक बैठका झाल्या त्यादरम्यान काही नवीन तरतुदीत बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये शासकीय शिधावाटप दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेल्या मानकांमध्ये बदल करण्यात आला असून, यासंदर्भात नवीन मानकाचा मसुदा देखील जवळपास तयार झाला आहे.Know that there will be a change in the rules of ration card from the government

तसेच या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ घेत असल्याने त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. त्यामुळेच हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करणार आहे. त्याचबरोबर या वितरणामध्ये अनियमितता येऊ नये म्हणून त्यासाठी नवीन मानकं पूर्णपणे पारदर्शक केले जाणार आहेत.

कंडोम बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच IPO आणण्याच्या तयारीत

त्यानंतर अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने या संदर्भात सांगितले की, यात बदल करण्याबाबत राज्यांसोबत बैठक घेतली जात असून, राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. त्यामुळे लवकरच ही मानके निश्चित केली जाणार आहे. तसेच याचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळणार असल्याने, अपात्र व्यक्तींना लाभ मिळू शकणार नाही.

दरम्यान अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड योजना’ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे NFSA अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळेच याचा लाभ दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन घेत आहेत.

आज पेट्रोल -डिझेलची काय अवस्था!

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!