टेक

सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवण्यासाठी या कंपनीने आणलाय सर्वात स्वस्त प्लॅन, जाणून घ्या

Buisness  Batmya

मुंबई : सध्या टेलिकॅाम कंपन्यांनी रिचार्ज दरात वाढ केल्याने सगळेच प्लॅन शंभरीपार गेले आहेत. त्यात फोनमध्ये दोन सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह ठेवणे फारच अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ब-याच जणांचे एकच सिम चालू तर दुसरे बंद असते. परंतु दोन्ही सिम चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करावा लागतो. त्यामुळे मोबाईल धारकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
मात्र आता हा आर्थिक भूर्दंड बसणार नाही. कारण आता सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवण्यासाठी एक कंपनी सर्वांत स्वस्तातला प्लान घेऊन आली आहे. चला तर मग पाहूया कोणता आहे प्लॅन..

तसेच प्रत्येक व्यक्तीला  सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवण्याचं जरी म्हटलं तरी मोठा रिचार्ज मारावाचं लागतो. त्यामुळे दोन्ही सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवणे ग्राहकांना आर्थिकरित्या फारचं अडचणीचे ठरत होते. त्यामुळे आता बीएसएनएलने सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवण्यासाठी सर्वांत स्वस्त प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Hyundai ची नवीन इलेक्ट्रिक कार काही खास वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल

6 महिने रिचार्ज करण्याची गरज नाही

या प्लॅनमध्ये तुम्हाला 19 रुपयांचा रिचार्ज करून एक महिन्यासाठी सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवता येणार आहे. तसेच सध्या सिम अ‍ॅक्टीव्ह ठेवण्यासाठी दर महिन्याला ग्राहक 100-120 चा रिचार्ज करत आहेत. मात्र याच किंमतीत बीएसएनएलचा सिम 6 महिने अ‍ॅक्टीव्ह राहणार असून, या प्लॅनमध्ये तुम्हाला 6 महिन्यांसाठी फक्त 114 रुपये खर्च करावे लागतील. आणि या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्ही 228 रुपयांमध्ये बीएसएनएलचे सिम वर्षभरही अ‍ॅक्टीव्ह ठेवू शकता.

दरम्यान, बीएसएनएलचा ऑन-नेटवर्क आणि ऑफ-नेटवर्क कॉल्सची किंमत 20 पैसे प्रति मिनिटापर्यंत खाली येते. त्यामुळे या प्लॅनसह ग्राहकाकडे इतर कोणताही डेटा प्लॅन किंवा सेवा नसली तरीही त्यांचा नंबर सक्रिय राहील. तसेच हा प्रीपेड प्लान Airtel, Vodafone Idea (Vi) आणि Jio पेक्षा खूपच स्वस्त असणार आहे.

व्हॉट्सॲप अपडेट करण्यासाठी तुम्हाला असे काही नोटिफिकेशन येत असेल तर सावधान!

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!