अवघ्या 3 सेकंदात 100 KM स्पीड, सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV लाँच

business batmya
कंपनीने या कारचे वर्णन जगातील सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV कार असे केले आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मार्की अॅस्टन मार्टिनने आपल्या नवीन SUV कारचे अनावरण केले आहे. या कारचे नाव DBX 707 असे आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्माता मार्की अॅस्टन मार्टिनने आपल्या नवीन SUV कारचे अनावरण केले आहे. या कारचे नाव DBX 707 असे आहे. कंपनीने या कारचे वर्णन जगातील सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV कार असे केले आहे.
Aston Martin DBX707 पॉवरफुल इंजिनसह येते, जे 697 hp पीक पॉवर जनरेट करते. या इंजिनच्या जोरावर ही कार अवघ्या 3.3 सेकंदात 0-100 किमी/तास इतका वेग धारण करु शकते.
Aston Martin DBX707 एसयूव्ही कारची किंमत 2.32 लाख डॉलर इतकी आहे. कंपनी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या कारचे उत्पादन सुरू करू शकते.
Aston Martin DBX707 लक्झरी SUV कार Porsche Cayenne Turbo GT आणि Lamborghini Urus ला टक्कर देईल.
Aston Martin DBX707 च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात 4.0 लीटर V8 इंजिन आहे, जे 697 hp ची पॉवर जनरेट करेल. तसेच, ते 900 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीने यामध्ये क्वाड एक्झिट अॅक्टिव्ह एक्झॉस्ट सिस्टीमचा वापर केला आहे.
Aston Martin DBX707 SUV कारमध्ये स्टँडर्ड 22-इंचांचे व्हील्स वापरण्यात आले आहेत, तर युजर्स त्यांच्या सोयीनुसार 23-इंचांची चाके देखील निवडू शकतात.