जबरदस्त लूकसह 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच, पहा किंमत

Buisness Batmya
सध्या बाजारात अनेक नवनवीन बाइक आल्या आहेत. त्यामुळे बाइक म्हटलं की आज सगळेच उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे कुठे एखादी नवीन बाइक बाजारात आली तर बाइकप्रेमी लगेच खरेदीसाठी उत्सुकता दाखवतात. अशातच आता एफबी मोंडिअल या बाइक निर्मात्या कंपनीने नवी 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच केली आहे.Launch the 125cc Pega Bike with Stunning Look, see price
भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला
दरम्यान या नवीन पीगा 125 मध्ये 124 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. जे 14.8 Bhp पॉवर आणि 10.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्यामुळे कंपनीने या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स दिला असून तुलनेत, केटीएम 125 Duke मध्ये बसवलेले इंजिन 14.5 bhp पॉवर आणि 12 Nm पीक टॉर्क पॉवर जनरेट करते. तसेच या एफबी मोंडिअल पीगा 125 चे एकूण वजन 135 किलो आहे. म्हणजेच ही बाइक केटीएम 125 ड्यूकपेक्षा वजनाने खूपच हलकी आहे.
पीगा बाइकचे फीचर्स आणि किंमत
पीगा 125 फीचर्स आणि स्पेअर्स लिस्टमध्ये समोरील बाजूस नॉन-एडजस्टेबल यूएसडी फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन यांचा समावेश आहे. तसेच या बाइकच्या दोन्ही चाकांमध्ये सिंगल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत. तर नवीन बाईकची किंमत 4,400 युरो (3.66 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. कंपनी भारतात नवीन पीगा 125 लॉन्च करेल की नाही, याबाबत अजून साशंकता आहे.
सॅमसंगचा 5G स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॅान्च, पहा किंमत आणि फिचर्स