LIC IPO: एलआयसी शेअर्स आज होणार सूचिबद्ध; गुंतवणूकदारांचं लागलं लक्ष

business batmya
मुंबईः
LIC Shares Listing: गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे (LIC) शेअर्स आज शेअर बाजारात सूचिबद्ध होणार आहेत. नुकतेच 4 मे ते 9 मे दरम्यान शेअर बाजारात एलआयसीच्या 20557 कोटी रुपयांच्या शेअर्सची प्रारंभिक विक्री झाली होती. दरम्यान आज मंगळवारी एलआयसी शेअर्सची शेअर बाजाराचं पदार्पण कसं होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC IPO) मंगळवारी दलाल स्ट्रीटमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. 20,557 कोटी रुपयांच्या IPO साठी सरकारला देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सरकारने LIC शेअर्सची किंमत 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूक
ग्रे बाजारात काय आहे भाव?
एलआयसीचे शेअर्स आता ग्रे मार्केटमध्ये थोड्या डिस्काउंटवर व्यवहार करत आहेत. LIC चे शेअर्स अनऑफिशियल मार्केटमध्ये 949 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 15-20 रुपयांच्या डिस्काउंटवर ट्रेडिंग करत होते.
बीएसई-एनएसई या दोन्ही ठिकाणी शेअर्स केले जातील सूचीबद्ध-
LIC स्टॉक मंगळवार 17 मे रोजी BSE आणि NSE दोन्हीवर सूचीबद्ध होईल. LIC चा IPO 9 मे रोजी बंद झाला आणि 12 मे रोजी बोलीदारांना शेअर्सचे वाटप करण्यात आले. सरकारने IPO द्वारे LIC मध्ये 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच 3.5 टक्के हिस्सेदारी ऑफर केली आहे. यासाठी, किंमत श्रेणी 902-949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.