इन्वेस्टमेंट

12 वर्षांखालील मुलांसाठी LIC ची नवी पॉलिसी, कमी पैशातं गंतवणूक करा व दुप्पट बोनस

विमा

Bussness batmya
मुंबईः सध्या महागाईचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की सर्वांच्या खिशाला कात्री लागत आहे. लोकांचे बजेट जे आहे ते कोलमडत आहे आणि त्यामुळे मुलांचे शिक्षण आरोग्य आणि इतर दैनंदिन खर्च करणं हे पालकांसाठी कठीण होऊन चालला आहे.  शाळा-कॉलेजेस यांच्यासाठी आधार  म्हणून एक एलआयसीने  (LIC ) ने नवीन पॉलिसी लॉन्च केली आहे.  ही पॉलिसी पाल्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जात आहे.LIC’s new policy for children under 12, invest less
पाल्यांसाठी मस्त योजना
एलआयसीने मुलांसाठी कोणती योजना आणली आहे हे आपण समजून घेणार आहोत. एलआयसी हे आपल्या भारत देशातील सगळ्यात मोठी विमा कंपनी गणली जाते. सर्वात मोठं विमा नेटवर्क म्हणून एलआयसीने नाव कमावलेला आहे. मुलांच्या गरजा पाहून एलआयसीने ही पॉलिसी तयार केली आहे. एलआयसी जीवन एक नॅान लींक्ड, सहभागी, व्यक्तिगत जीवन विमा बचत योजना आहे. जेव्हा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा एलआयसी संरक्षण आणि बचत दोन्ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देते मुलांचे शिक्षण आणि इतर काही गरजा असतील ते पाहून या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते.
तुमचं वय कसं लागणार

एलआयसी ना सहभाग घेण्यासाठी या मध्ये वयाची मर्यादा घालून दिलेली आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी त्या मुलाचं वय कमीत कमी 90 दिवसाचा असावं लागतं त्याचबरोबर यासाठी बारा वर्षाची कमाल वयोमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे बारा वर्षाखालील जर तुमच्याकडे मुला असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता

कसा होईल तुमचा फायदा

एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर एखादी व्यक्ती 90 दिवसांपासून एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या आपल्या मुलासाठी दरमहा सुमारे 2,800 रुपये देत असेल तर मुलाच्या नावे 15.66 लाख रुपयांचा निधी पॉलिसीची मुदत संपेपर्यंत जमा होतात. ही पॉलिसी 25 वर्षांत परिपक्व होते. त्याच वेळी, तुम्हाला 20 वर्षांसाठी दरमहा 2,800 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

दुप्पट बोनस

मूल 25 वर्षांचे झाल्यावर या पॉलिसीअंतर्गत संपूर्ण फायदे उपलब्ध आहेत.  तुम्हाला या योजनेवर मॅच्युरिटीच्या वेळी दुप्पट बोनस मिळू शकतो. तुम्ही ही पॉलिसी 75,000 च्या किमान सम इंश्योर्डवर घेऊ शकता. यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

कोणीही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर प्रीमियम भरू शकतो. ते NACH द्वारे भरले जाऊ शकते किंवा प्रीमियम थेट पगारातून कापला जाऊ शकतो. तुम्ही कोणत्याही अटींमध्ये प्रीमियम भरण्यास सक्षम नसल्यास

जे त्रैमासिक ते वार्षिक आधारावर प्रीमियम भरतात त्यांना 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळतो. दुसरीकडे, तुम्ही दरमहा पेमेंट जमा केल्यास, तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!