युट्यूब वरील छोटु दादा कमवितो एका व्हिडीओतून एवढे पैसे! How To Make Money From YouTube

business batmya /
साहेबराव ठाकरे
नाशिकः Little Grandpa earns so much money from a video on YouTube! शेतात किंवा इतर हार्ड कामामध्ये खूप काबाड कष्ट करून घाम गाळून, खूप पैसे मिळतात, असं आपल्याला वाटतं, मात्र हे सत्य नाही. हुशारी, युक्ती, आणि कल्पकता आणि कला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्वांना भारी पडू शकतात. युट्युब वरून लोक मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे. (How To Make Money From YouTube )आणि याचाच एक भाग म्हणून छोटु दादाकडे पाहिल्या जाते, कष्ट करावे लागतातचं, पण शेतातून लोक जास्त पैसे मिळवण्यासाठी धडपड करतात. तेच इतर ठिकाणी लक्ष देऊन केलं तर चांगले पैसे मिळतील यात शंका नाही.
युट्युब चा खूप मोठा स्टार असलेला छोटू दादा आज व्हिडीओ आणि युट्यूबच्या दुनियेत उंच शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे. आज छोटुदादाचे मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहे. अनेक हिंदी व्हिडिओ मधून मालेगावची अस्सल हिंदी भाषेमध्ये आज छोटू दादाने भारत नव्हे तर इतर देशांना भुरळ घातली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये शरीरातली कला, अलगदपणे बाहेर काढणारा छोटू दादा, आज युट्युब वरून चांगल्या प्रमाणात कमाई करत आहे. एवढं नाही तर मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहे. (How To Make Money From YouTube )
आपला समाज फक्त लोकांना टीका करण्यात नाव ठेवण्यात जातो, पण काळा आहे ,तू गोरा आहे, तू विकलांग आहे असं म्हणत आपण टीका करतो. कोणावर टीका करण्यात अर्थ नसून तुम्ही किती प्रत्येक कमवतात याला आजच्या युगात महत्त्व आहे. कारण घराच्या बाहेर तुम्ही निघाल्यानंतर तुम्हाला खिशाचा सल्ला घ्यावा लागतो.
व्यक्तीच्या रंग, रुप, उंची यावर त्याचं कर्तृत्व अवलंबून नसतं तर, त्याच्यात असलेली जिद्द आणि टॅलेंटवर ते ठरत असतं असं कायम म्हटलं जातं. असंच काहीसं मालेगावच्या छोटू दादाच्या बाबतीत घडल्याचं दिसून येतं. युट्यूबवर कॉमेडी व्हिडीओंचे ब्लॉग करुन हा छोटू दादा आज लोकप्रिय विनोदवीरांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे.
शफीक छोटू याचा जन्म २५ नोव्हेंबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे झाला.
छोटू दादा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कॉमेडिअनचं खरं नाव शफीक असं आहे. परंतु, कमी उंची असल्यामुळे त्याने त्याच्या युट्यूब चॅनेललाही ‘छोटू दादा’ हेच नाव दिलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखोंच्या संख्येने लाइक्स येत असतात.यूट्यूबचा राजपाल यादव म्हणून छोटू दादाची एक वेगळी ओळखही आहेय
शफीकची उंची केवळ 4.1 फूट आहे.
कमी उंचीमुळे गावातील सगळेजण त्याची चेष्टा करायचे. परंतु, या ट्रोलिंगमधूनच काहीतरी नवं करण्याची कल्पना त्याला सुचली. आणि,गावातील वसीम या व्यक्तीजवळ त्याने युट्यूब व्हिडीओ करण्याची इच्छा व्यक्त केली.
2017 मध्ये, शफीक छोटूला पहिल्यांदा वसीमच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या व्हिडिओमध्ये त्याने ‘छोटू हल्क’ची भूमिका साकारली होती.
आज, यूट्यूबवर छोटू दादाची लोकप्रियता प्रचंड वाढली असून तो अनेक दिग्गज सेलिब्रिटींना लोकप्रियतेमध्ये टक्कर देत आहे.
कमाईच्या बाबतीत अनेका कलाकारांना टक्कर देणाऱ्या छोटू दादाचं YouTube वर खान्देशी मुव्हीज नावाचे चॅनलदेखील असून त्याचे 29.7M सबस्क्रायबर्स असल्याचं सांगण्यात येतं. आज हे चॅनल भारतात प्रथम क्रमांकाचे असल्याचे बोललं जात आहे. कारण कॅमेडी मालेके मधून बीबीकी वाईन,अशिश चंचलानी, अमित भडाणा यांचे चॅनल येत आहे. असे सांगितले जाते.