बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 22 आॅक्टोबर 2024– नाशिक जिल्ह्याला पावसाने सळोकी पळव करून सोडलेला आहे परतीचा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडेल असं शेतकऱ्यांना कधीच वाटलं नाही.याचबरोबर व्यवसायिकांचेही पूर्णपणे पावसाने वाट लावलेले आहे. ढगांचा गडगडाटासह आणि विजेंचा कडकडाटासह नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्याला आज सकाळी सात वाजेपासून पावसाने झोडपण्यास सुरुवात केली.LIVE Stormy rain in Nashik district in the morning
जोरदार ढगांचा कडकडाट आणि विजेंच्या कडकडाटासह चांदवड तसेच मालेगाव तालुक्यातल्या अनेक भागांला पावसाने झोडपले.
चांदवड मधील वडबारे, नांदुरटेक, राजदेरवाडी,चिंचवे, राहुड, उसवाड, कानडगाव तसेच मालेगाव तालुक्यातील झाडी,एरंडगाव, सावकारवाडी, देवळा तालुक्यातील वाखारी सह इतर ठिकाणी सकाळी साडेसात वाजेपासून पावसाने हजेरी लावली.
आज नाशिक जिल्ह्यात पाऊस
नाशिक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, दिंडोरी,सिन्नर मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
दुपार नंतर अनेक ठिकाणी पाऊस बरसण्यास सुरुवात होणार आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.