मारूती सुझुकी कारच्या किमती या महिन्यात होणार महाग

buisness batmya
नवी दिल्ली : देशात सध्या सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने कार खरेदी करणा-यांना मोठा झटका दिला आहे. कारण पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या महागाईनंतर आता कारची सवारी सुद्धा महाग होणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या शेवटी वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे.Maruti Suzuki cars to become more expensive this month
यावर कंपनीने म्हटले आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे किमती वाढवून त्याचा काही भाग ग्राहकांवर लादणे गरजेचे झाले आहे. म्हणून कंपनीच्या सांगण्यावरून या महिन्याच्या अखेरीस वाहनांची किंमती वाढवण्याची योजना आखली आहे. तसेच या वाढणा-या किमती या वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे.
आता काही खरे नाही आज पुन्हा वाढले पेट्रोल डिझेल…लिटरचा भाव झाला एवढा
गेल्या एका वर्षात मारुती सुझुकीने चार वेळा आपल्या वाहनांच्या भावात वाढ केली आहेत. त्यामुळे कमोडिटीच्या भावात झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या वाहनांच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
याचा परिणाम कंपनीच्या मार्जिनवरही झाला असून कोणत्याही कार निर्मात्यासाठी इनपुट खर्च हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी साहित्याचा खर्च हा एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के असतो, परंतु मारुती सुझुकीसाठी तो 80.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळेच मारुती सुझुकीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले जात आहे.
कॉर्पोरेट कंपन्यांकडून राजकीय पक्षांना 1 वर्षात 720 कोटींचा निधी