Maruti Suzuki चा मोठा धमाका, Brezza नंतर 3 नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात करणार लाँच

Buisness Batmya
नवी दिल्लीः मारुतीने नुकतीच आपली सब 4 मीटर SUV Maruti Brezza लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. Brezza चे टॉप मॉडेल 13.80 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. आता कंपनी भारतात आणखी एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कारला YFG असे कोड नाव देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याचे नाव Maruti Suzuki Vitara असू शकते. मारुती सुझुकी पुढील वर्षी भारतात 3 नवीन SUV लाँच करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात विटारा सादर करू शकते. म्हणजेच यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. याशिवाय मारुती भारतात 2 नवीन SUV लाँच करण्याचा विचार करत आहे. या दोन्ही एसयूव्ही पुढील वर्षी बाजारात दाखल होतील.
Motorola चा MOTO G42 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत जाणून घ्या
कंपनी ऑगस्ट 2022 मध्ये मारुती विटाराचे उत्पादन सुरू करेल. हे मॉडेल सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Brezza आणि Toyota Highrider मध्ये देखील या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. विटाराची बहुतांश वैशिष्ट्ये टोयोटा हायराइडरसारखी असतील. मात्र, कंपनी या कारमध्ये काही बदलांसह सादर करणार आहे जेणेकरुन कारला बाजारपेठेनुसार नवीन लूक देता येईल.
तसेच कंपनी ही कार 1.5L K15C पेट्रोल इंजिन, सौम्य हायब्रिड सेटअप आणि Toyota चे 1.5L TNGA Atkinson सायकल इंजिनसह बाजारात आणणार आहे. ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लॉन्च केली जाईल. याशिवाय मारुती सुझुकी कंपनीकडे जिमनी 5 डोअर व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे.
सॅमसंगची खास ऑफर, तुम्ही फक्त 70% किंमत देऊन घरी आणू शकता प्रीमियम स्मार्ट टीव्ही!