मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात येण्यास सज्ज, किंमत किती पहा

buisness batmya
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने पुष्टी केली आहे की कंपनी 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल. तसेच कंपनी 2024-25 मध्ये या कारचे उत्पादन सुरू करणार असून कंपनीच्या गुजरातमधील प्लांटमध्ये या कारचे उत्पादन केले जाईल.
तसेच आगामी काळात कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी दोन नवीन उत्पादन प्रकल्प उघडणार आहे. त्यात हरियाणातील सोनीपतमधील खरखोडा येथे हे प्लांट उघडण्यात येणार आहेत. यासाठी कंपनी 11 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर कंपनी 2025 मध्ये पहिले युनिट उभारणार असून काही काळानंतर दुसरे युनिट उभारले जाणार आहे.
या शेअरने गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे झाले 1 कोटी
दरम्यान कंपनीने अद्याप आपल्या पहिल्या ईव्हीचे तपशील उघड केलेले नाहीत. तथापि, पहिल्या मारुती इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त असेल कारण ईव्ही तंत्रज्ञान आणि बॅटरी महाग आहेत याची पुष्टी केली आहे. मारुती सुझुकीने पुष्टी केली आहे की त्याची नवीन ईव्ही जी बर्याच काळापासून चाचणीत आहे ती बाजार-विशिष्ट आवश्यकता पूर्ण करेल आणि भारतीय हवामान परिस्थितीला अनुकूल असेल.
गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, या बँका देतात सर्वात स्वस्त गृहकर्ज