rupees to farmersमोदीनी शेतक-यांसाठी वर्ष प्रारंभीचं दिले हजारो कोटी रुपये

business batmya
नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या काळात दिलासा देण्यासाठी पंतप्रधानांच्या वतीने शेतकऱ्यांना दर चौथ्या महिन्याला २००० रुपयांची मदत दिली जाते. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत हीच रक्कम नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जारी करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पीएम किसान सन्मान निधी ( pm kisan yojana ) अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना १० वा हप्ता जारी केला आहे. (Modi gave thousands of crores of rupees to farmers at the beginning of the year )
पंतप्रधान मोदींनी १ जानेवारी २००२ ला म्हणजे आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १० वा हप्ता जारी केला आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आत्तापर्यंत दोन-दोन हजार रुपयांचे ९ हप्ते शेतकर्यांना देण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २००० रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये ६००० रुपयांची वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत १.६ लाख कोटी रुपये शेतकरी कुटुंबांना देण्यात आले आहेत. या दरम्यान पीएम किसानच्या जवळपास १० कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना २०,००० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ आहे. याशिवाय पीएम किसान टोल फ्री क्रमांक 18001155266 आणि पीएम किसान लँडलाइन क्रमांक 011-23381092, 011-24300606 आहे. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आहे. PM KISAN योजनेचे लाभार्थी १० व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासू शकतात. ही यादी pmkisan.gov.in पोर्टलवर अपलोड केली जाते. यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.