मोदी सरकारने PMSBY चे नियम बदलले

business batmya
नवी दिल्ली: केंद्र सरकारही सर्वसामान्य देशवासीयांसाठी अनेक योजना सादर करत असते. यामध्ये सुरक्षेविषयीच्या योजनांचाही समावेश आहे.देशभरात अनेकविध कंपन्या नाना प्रकारच्या विमा योजना ऑफर करत असतात.
यापैकी एक म्हणजे पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY). केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल केले असून, त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
गेल्या काही दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ जूनपासून अनेकविध गोष्टींच्या किमती, योजनांचे नियम बदलले आहेत. यामध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा समावेश आहे.
केंद्र सरकारने १ जूनपासून या योजनेच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. आता या योजनेचा वार्षिक प्रीमियम १२ रुपयांवरून २० रुपये केला आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला २ लाखांचा मृत्यू विमा देते. म्हणजेच, या अंतर्गत २ लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे, तर १ लाख रुपये वेगवेगळ्या परिस्थितीत उपलब्ध आहेत.