या कंपनीच्या एवढ्या हजारांहून अधिक कर्मचा-यांची होणार कपात

Buisness Batmya
जगभरात वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदीची गडद छाया तयार झाली असून आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता या कंपन्यांमध्ये ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचाही समावेश झाला असून हि कंपनीही नोकर कपात करण्याच्या तयारीत आहे.
Today Gold Price सोने झाले महाग, जाणून घ्या आजचे नवीन दर
दरम्यान अॅमेझॉनने नोव्हेंबर महिन्यात १० हजार कपातीची घोषणा केली होती. त्यात आता १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच अनिश्चित अर्थव्यवस्थेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच अॅण्डी जेसी यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, ई-कॉमर्स स्टोअर, अॅमेझॉन फ्रेश आणि अॅमेझॉन गो, पीएक्सटी विभागात ही कपात करण्यात येणार असून Amazon सध्या अनिश्चित अर्थव्यवस्थेतून जाणार आहे. तसेच, पुढेही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्यामुळे कपात करण्यात आली आहे.
याबाबत १८ जानेवारीपासून कार्यवाही सुरू होऊ शकते. तर 18 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे अॅमेझॉनमधून जवळपास 70 टक्के नोकऱ्या, मनुष्यबळ कमी होणार असल्याचा अंदाज आहे.
Share Market: भारतीय शेअर बाजार तेजीत सुरूवात, सेन्सेक्स पुन्हा 61 हजारांच्या वर