इन्वेस्टमेंट

मुकेश अंबानी आता उघडणार सलून.

business batmya

नवी दिल्ली :भारतात सर्वात मोठ्या असलेल्या रिटेल चेन रिलायन्स रिटेल आता सलून इंडस्ट्रीतही नाव कोरणार आहे. या क्षेत्रात उतरण्यासाठी रिलायन्स रिटेल चेन्नईतील नॅचरल्स सलून अँड स्पा या ग्रुपमध्ये 49 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करेल.

आता रिलायन्स समूह (Reliance Group) समुहाने आणखी एक कमाल केली आहे. हा समूह लवकरच सलून व्यवसायतही उडी घेत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुम्हाला केस कापायचे असतील अथवा चेहरा निखरायचा असेल तर रिलायन्सच्या सलूनमध्ये (Reliance Salon) या सुविधांचा लाभ घेता येईल.

टेलिकम्युनिकेशनसह, नॅचरल गॅस, पेट्रोल पंप, खनिज यासह आता आता किराणा, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्वच क्षेत्रात रिलायन्स समूह (Reliance Group) हातपाय पसरवत आहे.

या उद्योगात पाऊल ठेवण्यासाठी रिलायन्स रिटेल आणि नॅचरल्स सलून अॅंड स्पा यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. या चर्चनंतर पुढील घडामोडींना वेग येणार आहे. त्यानंतर या क्षेत्रात रिलायन्स दबदबा राहिल.

नॅचरल्स ग्रुपचे भारतात 650 हून अधिक सलून आहे. नॅचरल्स सलून अँड स्पाची सुरुवात 2000 साली सुरुवात झाली. 2025 मध्ये 3,000 पर्यंत सलून विस्तार करण्याची योजना या कंपनीची आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!