नाशिकः जिल्हा बँकेच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या ९०० कोटी रुपयांचा हिशोब देण्याचा आदेश- छगन भुजबळ
buisness batmya
नाशिक : जिल्ह्यात शेतक-यांच्या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक आयोजन करण्यात आलं असून, जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 9) नियोजन बैठक पार पडली आहे. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या ९०० कोटी रुपयांचा हिशोब देण्याचा आदेश दिला आहे.Nashik: District Bank’s Mahatma Phule Debt Relief Scheme ordered to pay Rs 900 crore – Chhagan Bhujbal
या बॅंकेत खाते असणा-यांना होणार 5 लाखांपर्यंत फायदा
त्यापैकी सहाशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, बाकी असलेले तीनशे कोटीही जिल्हा बँकेने शेतकर्यांना कर्ज देण्यासाठी वापरणे बंधनकारक होते, परंतु हे पैसे जिल्हा बँकेने ठेवी परत करण्यासाठी वापरले. त्यामुळे याबाबत गंभीर दखल घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महसूल आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच मागील नोटबंदीच्या काळात 2017 मध्ये नाशिक जिल्हा बँकेने सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे बदलण्यासाठी पाठवल्या होत्या. मात्र त्यापैकी केवळ तीनशे कोटींच्या नोटा बदलून दिल्याने उर्वरित असलेल्या साडेतीनशे कोटींच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेने आक्षेप घेत नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे.
(Share Market 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांचा झालाः1 लाखाचे झाले 35 लाख
म्हणूनच या प्रकरणाचीही महसूल आयुक्तांनी चौकशी करावी, असे आदेश पालकमंत्री भुजबळांनी दिले आहे. तसेच, ट्रॅक्टर लिलाव प्रक्रियेवर बोट ठेवत नेहमीच्या लिलावधारकांना प्राधान्य दिले जात असून, त्याबाबतदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.