नाशिकः ढगफुटीमुळे शेतपिकाचे नुकसान फक्त या शेतक-यांना मिळणार नुकसान भरपाई
नाशिकः ढगफुटीमुळे शेतपिकाचे नुकसान या शेतक-यांना मिळणार नुकसान भरपाई Crop insurance

business batmya / business News / बिझनेस बातम्या
साहेबराव ठाकरे
नाशिक,ता. 20 आॅक्टोबर 2024 -Crop insurance महाष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सलग अनेक दिवसापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस हजेरी लावत आहे.
अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक शेतक-याचे पिके पाण्याखाली गेली आहे.
आता ज्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले असे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र हि नुसकान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येईल ते आपण समजून घेणे फार गरजेचे आहे.
नाशिक जिल्ह्या सह राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे ज्या शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले असेल व ज्यांनी खरीप हंगाम २०२४ पिकांचा पीक विमा भरलेला असेल तर त्यांनी नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाइन करावी.
टीप – तक्रार करताना नुकसानीचे कारण हे फक्त Inundation (क्षेत्र जलमय होणे) किंवा Excess Rainfall (जास्त पाऊस) निवडावे म्हणजे आपला तक्रार रिजेक्ट होणार नाही..
तक्रार करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून क्रॉप इन्शुरन्स App डाउनलोड करा
तसेच पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क करून नुकसानीची माहिती देऊ शकता..
तक्रार केलेले नंबर लिहून ठेवा पोच पावती वरती किंवा ऑनलाईन केल्यास Dok Id आयडी ते पण व्यवस्थित लिहून screen shot काढून ठेवा.
Oriental Insurance Company कंपनीचा टोल फ्री क्रमांक -१४४४७
नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार केली तरच त्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळते याची कृपया सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.