नाशिकः मक्याचा भाव कुठपर्यंत गेला…माहित करुन घ्या

business batmya ( बीजनेस बातम्या )
नाशिकसह जिल्ह्यात यंदाही मक्याची विक्रमी पेरणी होण्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. व्हीएतनाम, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, कोलंबो येथे निर्यात होणारा मका राज्यातही भाव खात आहे. मुंबई, चेन्नई, कृष्णपटनमः पोर्टवरून सुमारे बारा ते सोळा लाख टन मका निर्यात झाला असून अजूनही मागणी वाढल्याने दर पंचवीसशे रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे यंदा इतिहासात कधी नव्हे इतका दर मिळाल्याने मकाच्या भावाचा विक्रम झाला आहे. दोन हजाराच्या वर कधीही न गेलेला मका यंदा अडीच हजाराचा टप्पा पार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार रुपये पडले आहेत.
मक्यासह कांदा, भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मका पीक घेण्यासाठी कमी भांडवल लागते. यंदा सोयाबीन, व मका पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात भर देतील हे भाववाढीवरुन समोर येत आहे.
येवला येथील बाजार समितीत मकाला २४१८ हा सर्वोच्च भाव मिळाला आहे. इतिहासातील हा विक्रमी दर मानला जातो.