नाशिकः अवैध देशी दारु वाहतुक 5 लाख 76 हजार 640 रुपयांचा ऐवज जप्त
नाशिकः अवैध देशी दारु वाहतुक 5 लाख 76 हजार 640 रुपयांचा ऐवज जप्त
business batmya / business News / बिझनेस बातम्या
सागर मोर
दिंडोरी, ता. 19 आॅक्टोबर 2024 -वणी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात महिन्द्रा मार्शल मधुन मद्याची तस्करी करणार्या दोन संशयीतांना पोलिसांनी पकडले असुन त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधिक्षक यांचे पथक वणी लखमापुर रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना अवैध मद्य वाहतुकीची माहीती पथकास कळविली. नौशाद सलिम शेख नैमणुक पोलिस मुख्यालय विशेष पथक ,पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे,पो हवा.बागुल ,अशोक चौरे ,भरत शिंदे ,किरण आहेर ,कुमार जाधव ,सुजित पोटींदे यांनी कोशिंबे भनवड मार्गावर वनारे भागात पाळत ठेवली असता MH 15 -AS -4620 या क्रमांकाचे सिल्वर रंगाचे महिन्द्रा कंपनीचे मार्शल वाहन थांबवुन त्याची तपासणी केली .
तेव्हा त्यात 1लाख 47 हजार 840 रुपयांचा देशी दारु व 28800 रुपयांच्या ओसी ब्ल्यू कंपनीची दारु तसेच 4 लाख रुपये किमतीचे मार्शल वाहन असा एकुण 5 लाख 76 हजार 640 रुपयांचा .राजेश(कृष्णा) बाळु बोडके रा.कोशिंबे तालुका दिंडोरी व किरण दिनेश नागरे यांचेवर गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.