
business batmya
नाशिकः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत असंघटीत अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे तसेच शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थाच्या उत्पादनासाठी सर्वकष मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या उद्देशासाठी 3 जानेवारी ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत ‘कृषि प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरी पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
तुमच्या बजेट मधील मस्त कार, वैशिष्टे पण दमदार
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे.
Shares return या शेअर्स मधून 1 लाखाचे झाले 11 लाख, मस्त परतावा
या योजनेंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्के पर्यंत व जास्तीत जास्त रूपये 10 लाख या मर्यादेपर्यंत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देय असणार आहे. यात सद्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रकल्पासाठी अनुदान देय आहे.
2021 ठरलं IPO फॅार, सर्वात प्रथम Paytm! २०२२ ला 2 लाख कोटींचे टार्गेट
या योजने बाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन अर्ज सादर करण्याविषयी माहिती कृषि विभागाच्या http://pmfme.mofpl.gov,in व एम.आय.एस. ॲप्लीकेशन http://pmfme.mofpi.gov.in/mis/#login या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यापासून ते बँक कर्ज मंजूरी या प्रक्रियेस गतिमानाता आणण्यासाठी इच्छुक व पात्र लभार्थ्यांनी वैयक्तिक सूक्ष्म प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंट, पायभूत सुविधा, ब्रँडींग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधन यासाठी प्रशिक्षण संस्था यासाठी विहित पद्धतीने प्रस्ताव सादर करावेत, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.