मोठी बातमीः नाशिक – ढगफुटीचा पाऊसाने धरण फुटलं..ट्रॅक्टर गेला वाहून (फोटो) Nashik cloudburst
मोठी बातमीः नाशिक - ढगफुटीचा पाऊसाने धरण फुटलं..ट्रॅक्टर गेला वाहून (फोटो)
बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 20 आॅक्टोबर 2024 Nashik cloudburst नाशिक सह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलाय, नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि चांदवड तालुक्याला पावसाने जोरदार झोडपलाय. एवढच नाही तर नाशिक सह आता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टामुळे आता पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.Nashik: The dam broke due to heavy rain..the tractor was carried away
नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि चांदवड तालुक्याला मोठ्या प्रमाणात ढगफुटीचा पाऊस झाल्याने धरण फुटले असून यामुळे मोठं नुकसान झालेले आहे. विहीरी वाहून गेल्या तर धरण फुटल्याने ट्रॅक्टर सुध्दा पाण्यात वाहून गेलायं.
चांदवड शहरातील अनेक दुकानामध्ये पाणी घुसल्याने अनेक व्यावसायिक दुकानदारांचा मोठ्या नुकसान झालं, त्यामध्ये अवधूत पेस्टिसाइड यांच्या दुकानात कमरा एवढं पाणी असल्यामुळे सर्व शेतीमालाचे औषधे पूर्णतः पाण्यात भिजवून गेली.
या अवधूत पेष्टीसाठीचे संचालक अभिजीत शेडगे यांनी लाखो रुपयांच्या नुकसान झाल्याचं वेगवान शी बोलताना सांगितलं. काल रात्री चांदवड शहरात व तालुक्यात ढगफुटी झाल्याने अतोनात नुकसान झालेला आहे. चांदवड शहरांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्यामध्ये गाड्या ज बुडाल्या दुकानांमध्ये पाणी घुसले. जनजीवन जे आहे ते चांदवड मधील विस्कळीत झाले आहेत. चांदवड तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाचा तांडव पाहायला मिळाले. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह चांदवड तालुक्याचा परिसर दणाणून सोडला होता.
चांदवड पासून काय अंतरावर असलेल्या आहेर वस्ती येथील धरण फुटल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाहत असल्यामुळे ट्रॅक्टर, विहीर, शेततळे हे वाहून गेलेला आहे.
शेतकऱ्यांचे यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला खरोखर पाऊस कशा पद्धतीने पडतो हे लक्षात येईल. आज नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस जोडणार असल्याचा अंदाज हवामान विभागांने वर्तवलेला आहे