व्हॉट्सअॅपवर आता लवकरच येणार हे नवीन फिचर्स, पहा कोणते

Buisness Batmya
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपमध्ये नव-नवीन फीचर्स येत आहेत. त्यातच आता व्हॉट्सअॅपवर लवकरच नवीन फीचर योणार आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात.त्यासाठी कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये एडिट बटण हे फीचर आणणार आहे.New features coming soon on WhatsApp, see which ones
तुम्ही 7 सीटर कार खरेदीचा विचार करताय, 10 लाखापेक्षा कमी किंमतीच्या कारसबद्दल जाणून घ्या
तसेच या WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, त्यामध्ये असे दिसते की, व्हॉट्सअॅप एक नवीन ऑप्शन विकसित करत आहे, ज्यामुळे मेसेज एडिट करता येईल. त्यामुळे याच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही त्यांची चूक सुधारू शकतात. त्यामुळे आगामी काळात काही बदल देखील होऊ शकतात. याचबरोबर, व्हॉट्सअॅप हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करत आहे. मात्र, या फीचरबद्दल यापेक्षा जास्त माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, अलीकडेच मेसेजिंग अॅपवर पेमेंट फीचर सादर करण्यात आले असून अॅपने व्हॉट्सअॅप पेमेंट्स फीचर्सच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक देणे सुरू केले आहे. जे युजर्स आपल्या मित्रांना किंवा कुटुंबियांना व्हॉट्सअॅप पेमेंटद्वारे पैसे पाठवतात, त्यांना कंपनी 35 रुपयांचा कॅशबॅक देत असून, हा कॅशबॅक फक्त तीन वेळा आणि तीन वेगवेगळ्या नंबरवर पैसे पाठवल्यास मिळणार आहे.