Nokiaचा स्टायलिश स्मार्टफोन लवकरच होणार बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

Buisness Batmya
मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी नेकियाने Nokia G11 स्मार्टफोन लॉन्च केला होता. अशातच आता नोकिया लवकरच स्टायलिश डिझाइनसह धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करणार असून फोनची किंमत खूपच कमी असणार आहे. तसेच ही कंपनी त्याच्या अपडेटेड व्हर्जनवर काम करत आहे, जो Nokia G11 Plus नावाने बाजारात लॉन्च केला जाणार आहे. तर चला जाणून घेऊया Nokia G11 Plus बद्दल.Nokia’s stylish smartphone will be launched soon, find out the price
नोकरी सोडून तरुणाने सुरू केले गाढवाचे दूध विक्री, वर्षात लाखोंची कमाई
Nokia G11 Plus बाकीच्या G-सिरीज स्मार्टफोन्स प्रमाणेच ऑक्टा-कोर Unisoc प्रोसेसरवर चालेल. तर ऑक्टा-कोर प्रोसेसर 1.61GHz वर क्लॉक केलेला आहे. तसेच याशिवाय हा स्मार्टफोन माली G57 GPU वर लिस्टिंग करत असून Nokia G11 Plus ला Unisoc T606 Soc द्वारा संचालित केले जाऊ शकते. तसेच हा स्मार्टफोन 4GB रॅमबरोबर येणार आहे.
Nokia G11 स्पेशिफिकेशन्स
नोकियाने अद्याप स्मार्टफोनबद्दल कोणत्याही तपशीलाची पुष्टी केलेली नसून, त्याची प्रोसेसर पाहता, हा नोकिया G11 सारखा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल. Nokia G11 मध्ये 6.5-इंचाची IPS LCD स्क्रीन एक टीयरड्रॉप नॉचसह आली होती. स्क्रीन 720 x 1600 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशन, 20: 9 आस्पेक्ट रेशियो, 90 Hz रिफ्रेश दर आणि 180 Hz टच सॅम्पलिंग दर देते. हे युनिसॉक T606 द्वारे काम करणार आहे. आणि 3 GB RAM सह जोडण्यात आले आहे.
BSNLचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, ३जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह १०० SMS, फक्त एवढ्या किंमतीत