Daily News

या तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस झोडपणार Rain Update

या तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस झोडपणार Rain Update

बिझनेस बातम्या

मुंबई, ता. 26 आॅक्टोबर 2024-Rain Update  महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाना चांगले झोडपल्याने शेती पिकाचे नुकसान झाले.  शेतकऱ्यांची पूर्णतः वाट लावली. सुरुवातीला पाऊस कमी होता मात्र परतीच्या पावसानं महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेला आहे. मका, सोयाबीन, कांदा पिकाचं मोठं नुकसान आहे. त्याचबरोबर इतर कडधान्य पिकालाही पावसाने चांगले झोडपून काढलं.

बंगालच्या उपसागरामध्ये दाना चक्रीवादळ तांडव करत आहे.  या तांडवाळामुळे  मोठं नुकसान झालेला आहे. उडीसा किन्नरपट्टीवरती हे वादळ धडकलं त्या आगोदर त्याचे वेग 120 किमी इतका होता.  दानाचा  ताशी वेग 75 किमी इतका झाला असून त्याची ताकद आता कमी झालेली आहे.  हे चक्रीवादळ आता कमकुवत  झालेले आहे.

आता त्याचा वेग जो आहे तो 75 किमी पर्यंत येऊन पोहोचला आहे. पुढील काही तासांमध्ये हे वादळ अगदी कमकुवत होणार आहे. दरम्यान याचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होणार नसला तरी या चक्रीवादळामुळे येणाऱ्या थोड्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात म्हणजेच दिवाळीमध्ये बे मोसमी पाऊस झोडपणार आहे. महाराष्ट्रासाठी हवामान विभागांना येलो अलर्ट दिला आहे.

येणाऱ्या  दिवसांमध्ये तुम्हाला शेतीचे काम पटकन करावी लागणार आहे. जेणेकरून तुमचं शेतातलं पीक जे आहे ते भिजणार नाही. शेतकऱ्यांसाठी हे अपडेट फार महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्रामध्ये  21 जिल्ह्यांना यलो अर्लट देण्यात आला आहे. दोन तीन दिवसानंतर  तीन दिवस ऐन दिवाळीत पाऊस महाराष्ट्रात पुन्हा हजेरी लावणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!